भारतीय सेनेने अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर भरती 2025 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत चालेल. या लेखात, आम्ही तुम्हाला या भरतीच्या संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
खालील तक्त्यात भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025 साठी पदांचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता दिलेली आहे:
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
1 | अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD) | 10वी उत्तीर्ण, एकूण 45% गुण आणि प्रत्येक विषयात 33% गु |
2 | अग्निवीर (टेक्निकल) | 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English). किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण+ ITI/ डिप्लोमा |
3 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts,Commerce, Science). |
4 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 10वी उत्तीर्ण, प्रत्येक विषयात 33% गुण |
5 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 08वी उत्तीर्ण, प्रत्येक विषयात 33% गुण |
भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025 साठी सहभागी जिल्ह्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे
- ARO पुणे: अहिल्या नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे आणि सोलापूर.
- ARO औरंगाबाद (छ.संभाजीनगर): छ.संभाजीनगर, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड आणि परभणी.
- ARO कोल्हापूर: कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा.
- ARO नागपूर: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया.
- ARO मुंबई: मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार आणि धुळे.
खालील तक्त्यात भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025 साठी पदांचे नाव आणि शारीरिक पात्रता दिलेली आहे
पद क्र. | पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (किलो) | छाती (सेमी) |
---|---|---|---|---|
1 | अग्निवीर (जनरल ड्यूटी – GD) | 168 | आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात | 77/82 |
2 | अग्निवीर (टेक्निकल) | 167 | 76/81 | 76/81 |
3 | अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 162 | 77/82 | 77/82 |
4 | अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 | 76/81 |
5 | अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) | 168 | 76/81 | 76/81 |
वयाची अट:
- जन्म तारीख: 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत: नियुक्ती संपूर्ण भारतात कुठेही होऊ शकते.
अर्ज शुल्क:
- ₹250/-: सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹250/- आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरले जाते.
आवश्यक कागदपत्रे
- 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- वैध वैयक्तिक ईमेल पत्ता
- मोबाइल नंबर
- निवास प्रमाणपत्र (राज्य, जिल्हा, तालुका/ब्लॉक)
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
अर्ज प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइटवर जा: joinindianarmy.nic.in वर जा.
- नोंदणी करा: तुम्ही नवीन वापरकर्ते असाल तर नोंदणी करा; अन्यथा, तुमच्या वापरकर्ता नाव आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- आवश्यक तपशील भरा: सर्व आवश्यक फील्ड भरा, भुगतान करा, आणि नंतर सबमिट करा.
- फॉर्म डाउनलोड करा: पूर्ण अर्ज फॉर्म डाउनलोड करा आणि एक प्रत प्रिंट करा.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2025
- Phase I: ऑनलाइन परीक्षा: जून 2025 पासून
- Phase II: भरती मेळावा: ऑनलाइन परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणी आणि इतर प्रक्रिया आयोजित केली जाईल.
महत्वाच्या लिंक्स:
- अधिकृत वेबसाइट: www.indianarmy.nic.in
- ऑनलाइन अर्ज करण्याचा लिंक: Apply Online
- जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक: click here